जतेत मोठा दारूसाठा जप्त,कोण घालतयं दारू विक्रेत्यांना पाठीशी ?

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात संचारबंदी असतानाही सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकत‌ पोलीसांनी बेकायदा ठेवलेेला 7 लाख 63 हजार 200 रूपयाचा  मोठा दारू साठा जप्त केला.सलग दुसऱ्या दिवशी पोलीसांनी हि कारवाई केली आहे.दरम्यान जत तालुक्यात कोरोनाच्या विळख्यात अडकला असताना दुसरीकडे दुकाने बंद असतानाही दारूचा महापूर वाहत आहे.याला कुणाचा वरहस्त आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,कोरोना संसर्ग रोकण्यासाठी सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीच्या अनुषांगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या आदेशावरून पोलीसांनी जत-बिळूर रोडवर असणाऱ्या आशिर्वाद‌ गार्डन येथे चोरून दारूची विक्री होत‌ असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने सापळा लावला असता हॉटेलच्या‌ उत्तर बाजूच्या खोलीमध्ये मँकडॉल 1 कंपनीचे 180 मिमी 92 बॉक्स त्यात प्रत्येक बॉक्समध्ये 48 बॉटल तसेच विदेशी मँकडॉल 1 कंपनीच्या‌ 750 मिमीच्या 12 बॉटल असलेले 14 बॉक्स असा 7 लाख 63 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त‌ केला.पोलीस हवलदार सचिन जौंजाळ यांच्या फिर्यादीवरून आशिर्वाद‌ गार्डनचे‌मालक निलेश भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.डिवायएसपी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.गोपाल भोसले,सचिन जौंजाळ,प्रविण पाटील,सचिन हाक्के,वहिदा ‌मुजावर,संतोष खांडेकर, पथकाने कारवाई केली.