जत तालुक्याचे धगधगते नेतृत्व | भिष्माचार्य माजी आमदार विलासराव जगताप (साहेब)


करे अल्पज्ञानी बहु बडबडाट। जसा निर्झराचा अति खळखळाट॥ 

असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।  विना नाद वाहे जशी गंगाधारा॥

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा मतदारसंघ विकासकामांनी चिंब करणारा एक दमदार आमदार जर कोण असेल तर, ते फक्त माजी आ. विलासराव जगताप होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व असा जगताप यांचा राज्याच्या राजकीय पटलावर नावलौकिक आहे. लोकहितार्थ निर्णय, विकासाभुमिख कारभार, कर्तव्यदक्ष, लोकसंग्रह, विविध निवडणूकांमधील विजय, पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच माजी आमदार विलासराव जगताप होत. राजकीय व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते नेते,गेल्या तीन दशकापासून जतच्या राजकारणातील हिरा,भिष्माचार्य म्हणून माजी आमदार जगताप यांची ओळख आहे.
त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा..


श्री विलासराव ना, जगताप यांची माहीती
जन्म : 1 मे 1949 (अक्षय तृतीया),शिक्षण: 7 वी पर्यंत प्रा. शाळा, को. बोबलाद,8 वी हनुमान विद्यामंदिर, बंकलगी, शासकीय मागासवर्गीय बोडौंग मध्ये 1 वर्ष,9 वी विवेक वर्धीनी विद्यालय पंढरपूर,11 वी काडादी हायस्कूल सोलापूर.डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर गर्व्हमेंट पॉल्टेक्नीक सोलापूर,
सन 1970 साली उजनी डॅम ज्यु इंजिनिअर नोकरी-हजर नाही.सन 1971 साली जि. प. बांधकाम नोकरी,1 वर्ष, पंचायत समिती मंगळवेढा 16 वर्षे लघु पाटबंधारे मध्ये नोकरी, द.सोलापूर, उ.सोलापूर, मोहाळ इ. ठिकाणी,पदे राज्य तांत्रिक कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष (राज्य पातळीवर),जि. प. कर्मचारी पसंस्थेचा अध्यक्ष सोलापूर
जि. प. कर्मचारी (14 संघटना फेडरेशनचा अध्यक्ष सोलापूर सन 1988 साली प्रस्थापिता विरुध्द बंड करण्यासाठी राजीनामा देत राजकीय जीवनास सुरूवात केली.1972 मध्ये को.कोबलाद सोसायटी निवडणुकीमध्ये सहभाग पहीली निवडणुक
जगताप पॅनेल पराभूत ( शिंदे विरुध्द जगताप)1975 परत निवडणूक सोसायटी जगताप गटाकडे - स्थानिक पातळीवर जगताप पार्टी विजयी,पहील्यांदा राखीव नसताना हरीजन व्यक्ती चेअरमन,शिंदे - जगताप गटाच्या संघर्षाला सुरुवात,1976 आणीबाणीच्या कालावधीमध्ये इंदीरा गांधीच्या विरोधारात मोहन धारीया, बापूसो काळदाते,अटल बिहारी वाजपेयी,जगन्नाथराव जोशी,मधु लिमये यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन स्वत: प्रचार (नोकरीवर असताना) केला.
तत्कालीन नेते बी.आर.शिदे सांगली बाजार समिती चेअरमन, आमदार सनमडीकर,
सभापती रामराव सावंत खोटी तक्रार,इतरांचय जमिनी, देवस्थानच्य जमीनी जगताप यांनी खरेदी केल्याचा आरोप, गावातील विठ्ठल मंदिर बांधण्याचा व कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.(येथून पुढे नोकरीच्या कालावधीमध्ये राजकीय संघर्ष रामराव सावंत विरुध्द निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला.(बंधू माणिकराव पं.स.सदस्य), राजाराम फार्माग सोसायटीकडे देवस्थान जमीनी होत्या त्या सोडवून घेतल्या.तानाजी बामणे लॉजवर मारामारी, रामराव सावंत यांचे सर्व बंधु, बी. आर. शिंदे त्यांची मुले अशोक,अरूण सहभागी केस दाखल.सोलापूर हुन उजनीला चुकीची बदली नंतर करमाळा येथे लांब बदली.बदली आदेश रद्द केला.जि. प. पंचायत समिती निवडणुकीपूर्वी साधारण 1990 साली 1 जि. म. बँक 1 मत्तानी पराभूत,तानाजी बोराडे विजयी.,स्व.विष्णु आण्णा यांनी शिंदे - जगताप गटाचे भांडण मिटविले.1972 साली जि. प. मध्ये स्वतः जगताप उमेदवार, माझे विरुध्द रामराव सावंत सभापती 11 वर्षे,उमेदवार बसवराज पाटील, गौडाप्पा बगली पंचायत समिती बिनविरोध,कॉग्रेसचे खासदार स्व.प्रकाशबापुंची मोठी मदत मिळाली.
जि.प. उपाध्यक्ष निवडणूकीत कॉग्रेस पक्षाचे विभाजन झाले. विष्णुआण्णा,शिवाजीराव नाईक, जयंत पाटील, मदन पाटील जि.प.
उपाध्यक्ष निवडीमध्ये जगताप यांच्या बाजुने राहिल्याने विरोधातील विजयसिंह डफळे 8 मतांनी डफळे पराभूत झाले होते.
जत साखर कारखाना दोन वेळेस डफळे राजेच्या पॅनेलचा पराभव करुन जगताप यांचे पॅनेल विजयी झाले.जगताप कारखान्याचे चेअरमन,त्यांनतर जि. म. बँक चेअरमन झाले.विरोधकांनी 27 खोट्या केसेस घालुन त्रास देण्याचा प्रयत्न 302 सारख्या केस मध्ये प्रमुख आरोपी करण्यात आले. या सर्व त्रासाला कंटाळून प्रस्थापिता विरुध्द लढण्यासाठी 1988 साली नोकरीचा राजीनामा देऊन थेट राजकारणात उतरले. त्यावेळेस फक्त मोरडी, दुगाणे, बसवराज पाटील एवढेच सहकारी होते.तालुक्यात कोणाचीही ओळख नसताना,प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली.सुरेख खाडे विरुध्द सनमडीकर लढतीत खाडे पराभूत झाले.सनमडीकर विरुध्द कांबळे निवडणूकीत : कांबळे जगताप यांच्या ताकतीवर विजयी झाले.पहिल्या खुल्या झालेल्या जत विधानसभा निवडणूकीत जगताप विरुध्द शेंडगे अशी लढत झाली.त्यात शेंडगे विजयी झाले. 


त्यानंतर पुढच्या निवडणूकीत पुन्हा जोमाने लढा दिला.त्यात जगताप विरुध्द शेंडगे अशी पुन्हा लढत झाली.त्यात जगताप विजयी झाले.त्यापुढील निवडणूकीत जगताप विरुध्द विक्रम सावंत अशा लढतीत जगताप यांना पराभव स्विकारावा लागला.मात्र त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणत सभापती पदे‌ आपल्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली.


मन मेणाहुनी आम्ही विष्णूदास
कठीण वज्रारु भेदू जैसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटो/ नाठाळाचे काठी देऊ माथी

स्वभाव ; अन्यायाने वागणाऱ्या प्रस्थापीतांच्या विरोध

• मागासलेल्या दुष्काळी तालुक्यातील दबलेल्या जनतेमध्ये जागृती करणे,
• तालुक्यातील रस्ते, पाणी विज यासाठी संघर्ष
• 1988 साली पहिला मोर्चा 37/3 कलम जारी.
• आतापर्यत 3 वेळा पंचायत समितीची सत्ता मिळविली.

• आमदारकीच्या कालावधीमध्ये अनेक रस्त्याचे दर्जोन्नती केली.तालुक्यातील सर्व गांवे डांबरी रस्त्याने जोडली.कर्नाटक व महाराष्ट्रातील सिमाभागातील रस्ते जोडले.
• बोर नदीवर 12  बंधारे बांधले.
• सिंगनहळ्ळी ओढ्यावर 5 बंधारे मंजुर केले.
• तालुक्यात सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे उभे केले.
• वाळेखिंडी, बसर्गी, उटगी,अंकले,जिरग्याळ येथे 33/11 वीज उपकेंद्रे 5 मंजुर केली.

• स्पष्ट वक्तेपणा, वारकरी सांप्रदायाचा वारसा
अन्याया विरुध्द लढण्यासाठी कोणाचाही मुलाहीजा न ठेवणारे, भोंदुगिरी अंधश्रध्देच्या
विरुध्द उच्चशिक्षीत, निर्भीड, स्पष्टवक्तेपणा.

• त्यामुळे नेता नाही- पक्ष नाही स्वतः विचारांशी प्रामाणिक, दुष्काळी जनतेशी प्रामाणिक,पराभवाची तमा न बाळगता पुढे चालत राहणे संघर्षामुळे परिणामांची चिंता नाही,

• नेत्यापुढे लाळ घोटेपणा नाही.कित्येक आले/कित्येक गेले त्याची तमा नाही.
विचाराशी व तालुक्यातील जनेशी प्रामाणिक त्यामुळे यश व अपयशाची चिंता नाही,अशी आक्रमक शैली असलेला भिष्माचार्य नेता अशी ख्याती आहे.