कुडणूरमध्ये 8 नागरिकांचा संशयास्पद आजाराने मुत्यू

डफळापूर,संकेत टाइम्स : कुडणूर ता.जत येथे गेल्या आठ दिवसात आठ‌ जणांचा मुत्यू झाला आहे. कोरोना संसर्गच्या भितीने अख्य गाव भयभीत झाले आहेत.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गंत येत असलेल्या कुडणूर उपकेंद्राचा नेमलेला डॉक्टर महिनाभर फिरकलाच नसल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याबरोबर मंगळवारी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला.केंद्राच्या अधिकाऱ्याला जाब विचारला.
डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गंत असणाऱ्या उपकेंद्राला नेमण्यात आलेले डॉक्टर व कर्मचारी कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही सातत्याने गैरहजर राहत असल्याने धोका वाढला आहे.कुडणूर येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. आठ दिवसात आठ नागरिकांचा झालेला मुत्यू नेमका कशामुळे झाला यांचा शोध लावण्याची गरजही वैद्यकीय‌ विभागाला वाटली नाही.कोरोनाची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आणखीन काही नागरिकांची प्रकृत्ती बिघडली आहे.नागरिकांचा मुत्यू होत आरोग्य विभागाकडून आम्हची दखल घेतली जात नाही,असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान महादेव पाटील, दिग्विजय चव्हाण यांनी केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत कारभार सुधारला पाहिजे अन्यथा आम्हाला पुढील निर्णय घ्यावा लागले असा इशारा दिला.पाटील, चव्हाण यांनी केंद्रात तळ ठोकला होता.यावेळी उपकेंद्रात उपस्थित नसणाऱ्या दोन डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे.
कुडणूर येथे आजपासून मयत नागरिकांच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावातील सर्व नागरिकांची तपासणीसाठी पथक नेमल्याचे‌ डॉ.अभिजीत चोथे यांनी सांगितले.


डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुडणूर प्रकरणावरून पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना जाब विचारला.