गौण खनिज वाहतूक,6 ट्रँक्टर 1 जेसीबी जप्त

जत,संकेत टाइम्स : संख‌ ता.जत‌ येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सहा ट्रँक्टर,एका जेसीबीवर कारवाई करून सात वाहने जप्त केली आहेत.
अपर‌ तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
संख अपरच्या‌ हद्दीत सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतूकीवर कडक‌ कारवाई करण्यासाठी महसूलीची पथके कार्यरत करण्यात आली आहेत.त्यांना संख,उमदी घोलेश्वर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रँक्टर व वळसंग येथे विना परवाना दोन ट्रँक्टर व एक जेसीबी पकडत पथकाने जप्त केला आहे.28 एप्रिल व चार मे रोजी उमदी येथे प्रत्येकी एक ट्रँक्टर तर 5 मेला वळसंग वस्ती येथे बेकायदा मुरूम वाहतूक करताना दोन ट्रँक्टर,एक जेसीबी जप्त केला आहे.6 मे मध्ये संख-आंसगी रोडवर एक ट्रँक्टर,7 मे रोजी घोलेश्वर- काराजनगी रस्त्यावर मध्यरात्री बेकायदा वाळू वाहतूक करत‌ असताना पथकाने छापा मारत‌ वाहने जप्त केली आहेत.सर्व वाहनांवर ‌दंडात्मक प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान जत पुर्व भागातील वाळू वाहतूक रोकण्यासाठी अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे सतर्क झाले असून कोरोनाची परिस्थिती हतावाळत