जत शहरासह पाच गावे धोक्याच्या स्थितीत | 50 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावात दक्षतेचे जिल्हा परिषद सीईओचे आदेश

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून तालुक्यातील जत सह डफळापूर,शेगाव,कोणीकोणूर,बिळूर या गावांच 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने ही गावे हॉस्टस्पॉट ठरली आहेत.या चार गावात ग्रामसुरक्षा समितीकडून सतर्क होत,कडक निर्बंधाची कडक अंमलबजावणी करावी,असे ‌आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.
जत तालुक्यात 50 पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रूग्ण असणारी तालुकानिहाय गावे व कंसात ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शेगाव (86), कोनीकोणूर (81), माडग्याळ 76,बिळूर (136), डफळापूर (73), जत (न.पा.) (383)मंगळवारी संध्याकाळ पर्यतची हि आकडेवारी आहे.
जत गावांमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ग्राम दक्षता समित्यांनी कंटेनमेंट झोन करून त्याचे कठोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. पॉझिटीव्ह रूग्ण आढळताच तात्काळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट यांचा शोध घेवून त्यांना होम आयसोलेशन करावे. होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्यांना विलगीकरण कक्ष स्थापन केलेल्या शाळेत ठेवावे. पॉझिटीव्ह रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास किंवा होम आयसोलेशनचे उलल्ंघन केल्यास संबंधितांवर ग्राम दक्षता समितीने गुन्हे दाखल करावेत. 
आपले गाव कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी कठोर निर्णय घ्यावेत. गावात बाहेरून येणाऱ्यांची तपासणी करावी, विलगीकरण, कटेनमेंट झोनमध्ये होम डिलीव्हरी आदि कामे ग्राम दक्षता समित्यांनी अधिक सक्रीय होवून करावीत. ही ग्राम दक्षता समित्यांची जबाबदारी आहे. पुढचे 8 ते 10 दिवस अत्यंत महत्वाचे असून बेड, व्हेंटीलेटर वाढविण्यावर मर्यादा आहेत. यावर मात करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.