माडग्याळमध्ये 40 बेडचे‌ कोविड रुग्णालय कार्यरत | आ.विक्रमसिंह सांवत यांच्या प्रयत्नाला यश ; पुर्व भागातील रुग्णांची झाली सोय

माडग्याळ, संकेत टाइम्स ; जत तालुक्यातील पुर्व भागात कोरोनाचा विस्फोट झाला असून माडग्याळ, उमदी,कुणीकोणूर सह अनेक गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत होता.त्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह सांवत यांनी अशा रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.
पालकमंत्री जयंत पाटील,जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे सातत्याने सांवत यांचा पाठपुरावा सुरू होता.त्यांच्या प्रयत्नाला पहिले यश आले असून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात 40 बेडचे ऑक्सीजन युक्त कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,संखचे तहसीलदार हणमंत म्हेत्रे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, संरपच इराण्णा जत्ती,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,डॉ.सतिश गडदे,उपसभापती विष्णू चव्हाण,तलाठी श्री.उदगिरी,ग्रामसेवक श्री.चव्हाण,आदी उपस्थित होते.जत पुर्व भागातील माडग्याळ, उमदी,संख,कुणीकोणूर अंकलगी आदी गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.त्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे माडग्याळ येथे कोविड रुग्णालय,उमदी,गुड्डापूर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी गतीने प्रयत्न सुरू केले होते.त्यातील माडग्याळ येथे 40 बेडचे ऑक्सीजन युक्त कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. 


तेथे ऑक्सीजन, प्रशिक्षित  डॉक्टर्स,नर्स,कर्मचारी,औषधे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे प्रकृत्ती खालावलेले, ऑक्सीजन पातळी कमी झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत.40 बेड येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.


आमदार सांवत म्हणाले,तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे,मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचार करण्यात मर्यादित आरोग्य यंत्रणामुळे मर्यादा पडत आहेत.त्यावरचा ताण कमी करण्यासाठी माडग्याळ, उमदी,गुड्डापूर येथे कोविड सेंटर उभे करावे यासाठी मी तालुका प्रशासन पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.


त्यातील पहिले माडग्याळ ‌येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे कोरोना रुग्णांना चोविस तास ऑक्सीजन,डॉक्टर्स,कर्मचारी,औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्व भागातील रुग्णांना लाभ होणार असून वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश येणार आहे. त्यापुढे उमदी,गुड्डापूर येथे अशा सुविधा मिळव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.रुग्णांनी भिती न बाळगता कणखर व्हावे,कोरोनाचे संक्रमण हटेल, नागरिकांनी प्रशासनाचे सुचना काटेकोर पाळाव्यात,कोरोनाला आपल्याला हरवायचे आहे, सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहनही आ.सांवत यांनी केले आहे.
माडग्याळ ता.जत येथील कोविड रुग्णालयाचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.