होम आयसोलेशनमधील रूग्णांच्या उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे टेलीमेडीसीनची सुविधा 3 मे पासून सुरू

सांगली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये सांगली जिल्ह्यात महानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रात दिवसेंदिवस कोविड बाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये बरेच रूग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.
अशा रूग्णांच्या उपचारासाठी व इतर गरजू रूग्णांच्या उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे टेलीमेडीसीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

            टेलीमेडीसीन सुविधा दि. 3 मे 2021 पासून कार्यान्वीत होईल. ही सुविधा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत उपलब्ध राहील. यासाठी 0233-2621400 व 0233-2621700 हे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.