शेगावमध्ये विना मास्क फिरणाऱ्या 25 नागरिकांवर कारवाई

शेगांव,संकेत टाइम्स : 
शेगांव ता.जत येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.सातत्याने नवे रुग्ण आढळून येत असल्याने ग्राम सुरक्षा दल सक्रीय झाले असून त्याकडून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून गावात विना मास्क फिरणाऱ्या 25 वाहनधारक,नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

गावात कोरोनाचे रुग्ण वाढीस अशी बेपर्वार्ह पणा कारणीभूत आहे.नागरिकांनी मास्क,सोशल डिस्टसिंग काटेकोर पाळावेत तरचं कोरोना रोखणे शक्य आहे.अन्यथा धोका वाढेल,असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी शेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव माने,उपसरपंच सचिन बोराडे, गावकामगार तलाठी अनिल हिप्परकर, कोतवाल सचिन व्हनखंडे, ग्रा.पं.सदस्य व ग्रा.पं.कर्मचारी देखील हजर होते.यावेळी मुख्य रस्ता चौकात फिरणाऱ्या वर कारवाई करण्यात आली.

शेगाव ता.जत येथे ग्रामसुरक्षा दलाकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली.