भिवर्गीत 24 तासात 4 तास विजपुरवठा | महावितरणचा गजब कारभार

0




भिवर्गी,संकेत टाइम्स ; भारत कृषिप्रधान देश असला, तरीही आपले प्रशासन आणि सरकारचे निर्णय मात्र, कृषिपूरक नाहीत; कारण दिवसातून किमान 8 तास शेतीसाठी विज लागते,पंरतू सध्या दिवसातून 3-4 तास एवढा वेळ विज पुरवा सुरू असतो.त्यातही चार-पाच वेळा विज ट्रिप होते.महावितरणच्या गजब कारभारचा प्रत्यय भिवर्गीसह परिसरातील शेेतकऱ्यांना येत आहे.

भिवर्गीत सध्या अंखडित विज पुरवठ्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.










Rate Card




गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे तलावातून केला जातो.योजनेच्या मोटारीलाही खंडित विज पुरवठ्याचा फटका बसत असून तलावापासून गावापर्यतच्या पाईपलाईन भरेपर्यत गोन-तीन वेळा विज

विज खंडित होत असल्याने पाणी असूनही नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दुसरीकडे काही प्रमाणात पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अखंडित विज पुरवठ्यामुळे मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय ऐन उन्हात वेळेत पाणी न मिळाल्याने पिके माना टाकत आहे.त्याशिवाय रोगाचेही आक्रमण शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना किमान आठ तास अखंडित विज पुरवठा करण्याचे आश्वासन देते,








दुसरीकडे संखच्या उपकेंद्रातील भोगळ कारभारामुळे भिवर्गी सह परिसरातील गावात सातत्याने विज खंडित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील नेत्याने खेडे गावातील या समस्याकडे लक्ष देऊन महावितरणच्या बेजबाबदार कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावे,अशी मागणी भिवर्गीचे संरपच मदगोंड सुसलाद,व उपसंरपच बसवराज चौगुले यांनी केली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.