जत तालुक्यात शनिवारी 144 नव्या रुग्णाची भर,134 कोरोनामुक्त | जत शहर,बिळूर,सनमडी,कुणीकोणूर हायरिस्कवर

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्ण वाढ कायम असून शनिवारी 144 नवे रुग्ण वाढले आहेत.जत शहरात सर्वाधिक 32 बाधित रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.दुसरीकडे 134 जणांनी कोरोनावर मात करत कोरोना मुक्त झाले आहेत.शनिवारी बिळूर,सनमडी,माडग्याळ,
कुणीकोणूर येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर कोरोना हॉटस्पॉट झाले आहे.शहरातील दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या जवळपास दोनशेच्या आसपास पोहचली आहे.शहरातील रुग्ण वाढत असल्याने जत नगरपरिषदेला जाग आली असून कोरोना चेन तोडण्यासाठी शहर पंधरा कडकडीत बंद करण्याची तयारी सुरू आहे.
एकीकडे रुग्ण संख्या सातत्याने वाढत असतानाही नगरपरिषद,आरोग्य विभाग,महसूल,पोलीसांनी गार्भिर्यं घेतले नाही.परिणामी कंन्टेटमेंट झोन गायब झाल्याने होम आयसोलेशन रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने धोका मोठ्या प्रमाणात बळवला आहे.पुढील काही दिवस बेक्र द चैन कार्यक्रम राबविण्याची शहरात गरज निर्माण झाली आहे.दुसरीकडे गतवेळेप्रमाणे बिळूर धोका रेषेवर आहे.शनिवारी पुन्हा 11 रुग्ण वाढले आहेत.दरम्यान संरपच नागनगौडा पाटील यांनी कडक निर्बंध करत गाव कडकडीत बंद ठेवले आहे.त्याशिवाय नागरिकांत जागृत्ती,आरोग्या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सनमडी,माडग्याळ,कुणीकोणूर येथेही रुग्ण वाढत असल्याने दक्षता घेण्याची गरज आहे. दुसरीकडे डफळापूर येथील रुग्ण वाढीचा आलेख खालावला असून ग्रामपंचायतीने पाच दिवसासाठी गाव कडकडीत बंद ठेवले आहे.त्याचा चांगला परिणाम दिसून आला असून रुग्णाची वाढ थांबली आहे.गेल्या तीन दिवसात डफळापूर येथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जत शहर 32,बिळूर 11,उमदी 2,वळसंग 4,शेगाव 2,मुंचडी 1,माडग्याळ 6,जा.बोबलाद 3,सनमडी 15,उमराणी 2,अंकलगी 1,लोहगाव 1,उटगी 2,खैराव 1,येळवी 3,सोरडी 1,बालगाव 1,रा.वाडी 1,कोळिगिरी 1,कोसारी 2,रेवनाळ 2,खोजानवाडी 1,गुड्डापूर 1,रामपुर 1,सिंदूर 1,काराजनगी 4,कुणीकोणूर 13,अंतराळ 1,मोटेवाडी 1,सिंगनहळ्ळी 1,गोधळेवाडी 2,बिरनाळ 2,करेवाडी को.4,बागलवाडी 1असे 144 रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4,394 झाली आहे.शनिवारी आणखीन एका रुग्णाचा मुत्यू झाल्याने मुत्यू संख्या 98 वर पोहचली आहे.तालुक्यात 134 जण कोरोना मुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.सध्या 1167 रुग्णावर उपचार सुरू आहेत.त्यातील 990 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.