सांगलीत 1355 रुग्ण कोरोनामुक्त,46 जणांचा मुत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यात 1355 रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर रविवारी 1341 रुग्ण आढळून आले आहेत.रविवारी कोरोना मुक्त झालेले रुग्ण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. तर दुर्देवाने जिल्ह्यातील 46,तर परजिल्ह्यातील 12 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.आटपाडी 125,कडेगाव 72,खानापूर 123,पलूस 52,तासगांव 119,सांगली महापालिका 201,जत‌ 195,कवटेमहांकाळ 80,मिरज‌ 184,शिराळा 38,वाळवा 152 अशा 1341 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आटपाडी 1,कडेगांव 4,खानापूर 9,पलूस 1,तासगांव 4,सांगली महापालिका 9,जत 7,मिरज 7,शिराळा 1,वाळवा 3 अशा जिल्ह्यातील 46 तर पर जिल्ह्यातील 12 जणांचा‌ मुत्यू झाला आहे. जिल्ह्यात 16968 रुग्ण उपचाराखाली आहेत.