जत,बिळूर,कुणीकोणूर हायरिस्कवर |तालुक्यात 135 नवे रुग्ण | पश्चिम भागातील 17 गावात एकही रुग्ण नाही

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोना प्रभाव कायम आहे.रविवारी तालुक्यात 135 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जत शहरातील 31 रुग्णाचा समावेश आहे.तिघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.जत नगरपरिषदेच्या भोगळ कारभारामुळे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे.सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही नगरपरिषदेची यंत्रणा कोमात आहे.
मुख्याधिकारी सारखे पद प्रभारी असल्याने कर्मचाऱ्यावरचे नियंत्रण सुटले आहे.परिणामी कोरोना बाबत उपाययोजना खड्ड्यात गेल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
तालुक्यातील बिळूर,कुणीकोणूर येथे कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गत तीन दिवसात या दोन्ही गावात कोरोना रुग्णाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.रविवारीही बिळूर 25,तर कुणीकोणूरमध्ये 27 नवे रुग्ण आढळून आले आहेत.सनमडी,गुगवाड,वज्रवाड येथेही पाचपेक्षा जादा रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. नविन पॉझीटिव्ह रुग्ण असे जत 31,बिळुर 25, संख 1,उमदी 2, शेगाव 1, सनमडी 5, पाच्छापूर 1, खैराव 3,बालगाव 1, रा.वाडी 1, बसर्गी 3,घाटगेवाडी 1, बेवणूर 2, हिवरे 1, गुगवाड 5, टोणेवाडी 2,कुंभारी 2,कोसारी 1,ऊंटवाडी 2, बागेवाडी 2, सुसलाद 1, कुणीकोणूर 27, मोटेवाडी 1 पांडोझरी 3, वज्रवाड 6,करेवाडी को.बो.1, एकुंडी 2, येळदरी 1, सोनलगी 1 असे रविवारी एकूण 135 रुग्ण आढळून आले आहेत.तर तिघा रुग्णाचा दुर्देवाने कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.जत रविवारी 86 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यात 1213 रुग्ण उपचाराखाली आहेत.

त्यापैंकी 1051 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तालुक्यातील पश्चिम भागातील डफळापूर सह 17 गावात सलग चौथ्या दिवशी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.तर जत शहरासह पुर्व,पश्चिम, दक्षिण भागातील अनेक गावांची चिंता वाढली आहे.त्यात बिळूर,कुणीकोणूरमध्ये धोका निर्माण झाला आहे. दोन्ही गावात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ब्रेक द चेनची कारवाई करण्यात आली आहे.