जत तालुक्यात मंगळवारी 123 रुग्ण कोरोनामुक्त

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवार 105 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर तब्बल 123 रुग्ण कोरोना मुक्त झाले तालुक्यातील 
जत शहर,माडग्याळ ‌येथे‌ रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे,त्यामुळे चिंता वाढली आहे.

जत तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4747  वर पोहचली आहे. सध्या तालुक्यात 1204 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यातील1046 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
जत शहर 27,उमदी 1,सुसलाद 1,उंटवाडी 1,शेगाव 4,बनाळी 1,कुणीकोणूर 4,येळवी 2,जाळीहाळ बु.1,धुळकरवाडी 1,बिळूर 7,


गुगवाड 1,अचनहळ्ळी 2,व लंवगा 1,देवनाळ 1,आंवढी 1,मुंचडी 1,सोन्याळ 2,काराजनगी 1,भिवर्गी 1,उमराणी 3,मेंढेगिरी 1,संख 3,जा.बोबलाद 4,जाळ्याळ बु.1,येळदरी 1,कुडणूर 1,जा.बोबलाद 4,माडग्याळ 15,गुड्डापूर 2 वाषाण 1,सनमडी 1,रेवनाळ 1,खोजानवाडी 1,पाच्छापूर 3,डफळापूर 1 येथे एकूण 105 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात 123 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर मंगळवारी  एकाही रुग्णाचा‌ मुत्य झालेला नाही.मुत्यू संख्या 104 वर पोहचली आहे.