जत तालुक्यात सोमवारी 113 रुग्णाची भर | जत शहर,उमदी,बनाळी,अंतराळमध्ये रुग्ण वाढले

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत‌ शहर,शेगाव,उमदी,अंतराळची चिंता वाढली असून तेथे पाचपेक्षा जादा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.



तालुक्यातील 3 रुग्णाचा सोमवारी मुत्यू झाला आहे. तर तब्बल 101 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.दुसरीकडे रुग्ण वाढ कायम असल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 4,642 वर पोहचली असून 1222 रुग्ण सध्या उपचाराखाली असून 1055 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये‌ आहेत.




जत शहर 26,आंवढी 1,निगडी बु 1,बिळूर 4,मेंढेगिरी 1,अचनहळ्ळी 4,संख 2,उमदी 7,वळसंग 2,शेगाव 5,मुंचडी 1,माडग्याळ 4,सनमडी 1,पाच्छापूर 3,उमराणी 2,गुंळवंची 1,उटगी 1,येळवी 3,सोर्डी 2,कुणीकोणूर 1,कोळगिरी 1,जाल्याळ बु.1,गुगवाड 1,तिकोंडी 2,खंडनाळ 1,देवनाळ 1,कोसारी 1,बनाळी 6,रेवनाळ 1,आसंगी जत 2,रामपूर 1,बागेवाडी 3,सिंदूर 1,अंतराळ 6,गोंधळेवाडी 1,दरिबडची 1,वज्रवाड 4,करेवाडी को.1,कासलिंगवाडी 1,बोर्गी बु.1,डफळापूर 2 असे एकूण 113 नवे रुग्ण आढळून आले आहेत.




तालुक्यातील बिळूर,कुणीकोणूर,येथील रुग्णसंख्या सोमवारी कमी झाली आहे.आजपासून प्रशासनाकडून तालुक्यात पुकारण्यात आलेल्या जनता कर्प्यूत नागरिकांनी सहभाग घेऊन घराबाहेर न पडता कोरोना संसर्ग चेन तोडण्यासाठी सहकार्य‌ असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.