जतेतील 100 बेडच्या रुग्णालय निर्मितीला सुरूवात

जत,संकेत टाइम्स : जत शहरात भाजपा पदाधिकारी यांच्या मागणीवरून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशावरून होत असलेल्या 100 ऑक्सीजन बेड कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी मंगळवारी जि.प.चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकात गुड्डेवार यांनी केली.
जत शहरातील समाजकल्याण विभागाचे वस्तीगृह येथे हे कोविड रुग्णालय होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
तेथे संपुर्ण 100 बेड ऑक्सीजन व सहा व्हेंटिलेटर,प्रशिक्षित डॉक्टर्स,नर्सेस,औषधाची सोय करण्यात येणार आहे. रुग्णालय निर्माण करण्याच्या तयारीला मंगळवार पासून सुरूवात केल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी सांगितले.तात्काळ 100 बेडची ऑर्डर दिल्याचेही सांगण्यात आले.जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट रोकण्यासाठी या रुग्णालयचा फायदा जत तालुक्यातील रुग्णाना होणार आहे.
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,सभापती मनोज जगताप,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौंडा रवीपाटील आदी उपस्थित होते.

जत येथील बैठकीत बोलताना चंद्रकांत गुड्डेवार,उपस्थित मान्यवर