कोरोना लस प्रभावी,भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे ; बसवराज पाटील

डफळापूर,संकेत टाइम्स : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या कोराना लस प्रभावी ठरत असून लसीकरण झालेले नागरिक सर्वाधिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.पाटील यांनी त्यांच्या एंकूडी गावालगतच्या जिरग्याळ उपकेंद्रात नुकतीच लस टोचून घेतली.
पाटील म्हणाले,कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही गावागावातील संरपच,उपसंरपच,ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक,कर्मचाऱ्यावर कोरोना थोपविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आहे.त्यामुळे नागरिकात मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटायझर, जागृत्ती करण्याबरोबर कोरोना लसी घ्यावी,असे आवाहन करावे,असेही पाटील यांनी सांगितले.
त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर संरपच, उपसंरपच सह ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर असल्याने त्यांना लसीकरणासाठी वयाची अट नाही.कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांचे पत्र जोडून लसीकरण करून घ्यावे,कोरोनाला हरवायचे आहे,त्यासाठी संरपचांनी गावाचे संरक्षण करावे, असेही आवाहन पाटील यांनी केले.


संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी कोरोना लस टोचून घेतली.