संखमधील आत्महत्याग्रस्त कुंटुबियांना डॉ.भाऊसाहेब पवार यांची मदत

जत,संकेत टाइम्स : संख,ता.जत येथील मयत शेतकरी सिध्दमला शिवराय जनगोंड यांच्या वारसास संखचे 
दानसूर डॉ.भाऊसाहेब पवार यांनी रोख 25 हजार रूपये आर्थिक मदत करत,कुंटुबियांना आधार दिला.
संख येथील अल्पभूधारक शेतकरी सिध्दमला जनगोंड यांची संख मध्यम प्रकल्पाच्या लगत एकर शेती आहे.त्यात जनगोंड भाजीपाला करून कुंटुंबाचा गाडा चालवित होते.सलग दोन वर्षे या भागात पाऊस पडल्यामुळे संख तलावातील पाण्यात जनगोंड यांची शेती पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे या शेतीसाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी यावर्षी त्यांनी कुंटुंबासह ऊसतोडीची उचल घेतली होती.कुंटुंबियांना ऊसतोड करावी लागली,शेतीही पिकेना या विवेंचनात त्यांनी गेल्या पंधरा दिवसापुर्वी आत्महत्या केली होती.सध्या त्यांच्या पश्चात कुंटुंबिय मोठ्या अडचणीत आहे.संखमधिल अनेक सामाजिक कार्यात वाहून घेतलेले दानसूर व्यक्तिमहत्व असलेले डॉ.भाऊसाहेब पवार हे जनगोड यांच्या कुंटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत.
 त्यांनी नुकतीच त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा जनगोड,मुलगा सचिन जनगोड यांची भेट घेत सांत्वन करत तातडीने रोख 25 हजाराची मदत केली.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते भिमाशंकर बिराजदार,सोसायटीचे व्हा.चेअरमन शरणाप्पा शिळीन उपस्थित होते.
डॉ.पवार म्हणाले,निसर्गाच्या कालचक्रात शेतकऱ्यांनी बदलण्याची गरज आहे. अनेक देश शेतीत आधुनिकीकरण करून प्रगती करत आहेत. मात्र भारतात सुपिक जमिन,मुबलक मनुष्यबळ,सध्याच्या स्थितीत पाणीही बऱ्यापैंकी उपलब्ध आहे.निर्सगाचे‌ बदलेले संदर्भ यांची माहिती घेत समृद्ध, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची वेळ आली आहे.त्याशिवाय शेतकरी खर्च,उत्पन्नाची सांगड घालू शकणार नाही.उत्पन्नात वाढ झाली तरचं शेती व्यवसाय फायद्याचा ठरेल अन्यथा कर्जे,खर्चात शेतकरी आणखीन अडचणीत येऊ शकतो.
आम्ही सातत्याने शेतीत नवे प्रयोग करत आहोत.डॉ.पवार म्हणाले,माझ्या उत्पन्नातील काही वाट्यातून मी सामाजिक बांधिलकी म्हणून अडचणीतील लोंकाना मदतीचा हातभार लावतो,चनगौड कुंटुंबियावर दु:खाचा डोंगर उभा आहे.ईश्वर त्यांना त्यातून सावरण्याची शक्ती देवो,मी तात्काळ 25 हजाराची मदत दिली आहे. त्यातून त्यांना काही प्रमाणात मदत होणार आहे.


त्याशिवाय यापुढे त्यांच्या कुंटुंबियांना सहकार्य करत राहू असे आश्वासन डॉ.पवार यांनी दिले.


संख येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुंबियांना डॉ.भाऊसाहेब पवार हे आर्थिक मदतीचा चेक देताना