लॉकडाऊन नगरसेवक बसले उपोषणाला

 

सांगली : लॉकडाउनच्या विरोधात नगरसेवक अभिजित भोसले हे उपोषणाला बसले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाउन बाबत कठोरपणे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे सर्वसाधारणपणे  कष्टकरी कामगार वर्ग हातगाडीवाले फेरीवाले किरकोळ विक्रेते छोटे-छोटे कारखानदार इतर छोटे व्यावसायिक आणि व्यापारी यांचा विचार करता त्या सर्वांनाच जगण्यासाठी मारामार करावी लागणार आहे.


आणि अशा परिस्थितीत कोरोनासाठी केवळ आणि केवळ लॉक डाऊन  हा उपाय नव्हे. वास्तविक पाहता केवळ आणि केवळ आरोग्य व्यवस्था सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे ह्यावर भर द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.