महाराष्ट्र- कर्नाटक सिमावरील अवैध वाहतूकीने यंत्रणेला आवाहन

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्याच्या‌ सिमा आहे.शिंगणापूर,गुगवाड,सिंदूर,उमराणी,मुंचडी,कोतेबोबलाद,उमदीपर्यत भली मोठी कर्नाटक महाराष्ट्र सिमा भाग आहे.कर्नाटक लगची महाराष्ट्रातील गावे अवैध धंदे,तस्करी,अवैध दारू,गांज्या,चंदन तस्करीचे केंद्रे बनत आहेत.कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात‌ महाराष्ट्रात बंद असलेला गुटखा,माव्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहे. यामाध्यमातून गावागावात मावा,गुटखा विकणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.याकडे स्थानिक सुरक्षा ‌समित्या,तालुका प्रशासनासह पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र अशा प्रकाराने तालुक्यात कोरोनाचा विस्फोट वाढल्यास वावगे वाटू नये.