विवाहितेला मारहाण,पती,सासू-सासरेसह पाच जणाविरोधात गुन्हा दाखल

जत,संकेत टाइम्स : जत येथील विवाहितेचा मारहाण केल्याप्रकरणी पती,सासू,सासरे,दीर,जावे विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.रणजित प्रकाश पल्ले,प्रकाश बाबूराव फल्ले,सुरेखा प्रकाश फल्ले,रोहित प्रकाश फल्ले,अश्विनी रोहित फल्ले अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादीचा विवाह रणजित फल्ले यांच्याशी झाला आहे.लग्न झाल्यापासून पती,सासू-सासरे,दीर-जावू लग्नात मानपान केला नाही.चांगले जेवन करून देत नाहीस,तुझ्यामुळे आमच्या घरात भांडणे होतात.म्हणून वाईटवगाळ शिवीगाळ करून माहेरून मोबाइल दुकान टाकणेसाठी 5 लाखापैंकी 4 लाख रूपये घेऊन आली नाहीस.म्हणून फिर्यादीस उपाशीपोटी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.यावरून जत पोलीसांनी 498 अ,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.नि.उत्तम जाधव करत आहेत.