वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून जतेत रवीवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

जत,संकेत टाइम्स : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परिवार,जत‌ यांच्या वतीने रविवार ता.18 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबीराचे‌ आयोजन केले आहे,अशी माहिती आण्णासाहेब कोडग यांनी दिली आहे.सध्या देशभरात कोरोना साथीचे थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे.परिणामी रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे,यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परिवाराकडून जतेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रंशात आवटे,डिवायएसपी रत्नाकर नवले,तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, पो.नि.उत्तम जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर उपस्थितीत होणार आहे.जत शहरातील बचत भवन येथे सकाळी 7 ते सांयकाळी 5 वाजेपर्यत हे शिबिर आयोजित केले आहे.
यात तालुक्यातील रक्तदात्यानी सहभागी व्हावे,असे आवाहन विश्वजित सूर्यवंशी,वंसत चव्हाण,आण्णासाहेब कोडग,विशाल गायकवाड यांनी केले आहे.