ओम साई प्रतिष्ठानकडून शेगावमध्ये पाणपोईची सोय

शेगाव,आंवढी,संकेत टाइम्स : ओम साई प्रतिष्ठान शेगाव या संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून मारुती मंदिर शेगाव या ठिकाणी थंड पाण्याच्या  पाणपोईचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ.शिवाजी खिलारे यांचे हस्ते करण्यात आले.दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाळ्यामुळे, गावात येणारे ग्रामस्थ व विशेषतः मारुती मंदिर येथे विश्रांतीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांचेसाठी या पाणपोईची सुरुवात केल्याचे ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान माने यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपसरपंच सचिन बोराडे, माजी सरपंच लक्ष्मण बोराडे,धोंडीराम माने, ग्रामपंचायत सदस्य विष्णू शिंदे,हणमंत  माने,लवकुमार मुळे,महादेव माने,दादा पाटील,कल्लु नाईक,संभाजी आबा,डॉ.विश्वास बाबर,चंद्रकांत गायकवाड,बंडा बोराडेे उपस्थित होते.शेवाग ता.जत येथील ओम साई प्रतिष्ठानकडून पाणपोईची सोय करण्यात आली आहे.