जत शहराची चिंता कायममुख्याधिकारी येईनात,नेत्याचे दुर्लक्ष,नागरिकांचे हाल

जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असलेली संख्या विचारात घेऊन तालुका प्रशासन,आरोग्य विभाग व जत नगरपरिषदेने जत शहरातील  सर्व व्यवसाईक,भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांची कोरोना टेस्ट करावी अशी मागणी जत पापा कुंभार यांनी केली आहे.जत तालुक्यात
दिवसेंदिवस वाढत असलेली ही कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या जतकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. प्रशासन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या परिने प्रयत्न करित आहे.परंतु नागरिक मात्र कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. 
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर कोरोना कालावधीत ही बिनकामाचं फिरणारेंची वर्दळ पहावयास मिळत आहे.शहरात बहुतांशी नागरिक हे कोरोना नियम पायदळी तुडवित असताना दिसतात. तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, जमावबंदीचा आदेश धुडकावणे असे वर्तन करित असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यातच जत नगरपरिषद ही कोरोना काळात फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.जत नगरपरिषद कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबविताना दिसत नाही. 
जत नगरपरिषद सत्ताधारी व विरोधक त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे नगरसेवक यांच्यामध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत.जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे वैद्यकिय रजेच्या नावाखाली गेले तीनचार महिने रजेवर गेल्याने नगरपरिषदेच्या प्रशासनाचा सावळा गोंधळ चालू आहे. आंधळ दळतंय आणी कुत्र पिठ खातय अशी अवस्था जत नगरपरिषदेची आहे.कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जत नगरपरिषदेला प्रशासनाने कायमस्वरूपी असा मुख्याधिकारी द्यावा अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.