भिवर्गीमध्ये‌ कोविड लसीकरणास चांगला प्रतिसाद

भिवर्गी, संकेत टाइम्स : भिवर्गी (ता.जत) येथे शनिवारी लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली.
चार दिवसापुर्वी संरपच,उपसंरपच यांनी गावात घरोघरी जात‌ लसीकरण करून घेण्याबाबत जनजागृत्ती केली होती.त्यामुळे शनिवारी 45 वर्षावरील नागरिकांचा लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला.सरपंच मदगोंड सुसलाद व उपसरपंच बसवराज चौगुले यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरूवात करण्यात आली.
यावेळी डॉ.बसर्गी,आरोग्य सेवक सुर्यवंशी, सुरेखा राठोड,ग्रामसेवक कोरे, पोलिस पाटील श्रीशैल चौगुले,धर्मराय सुसलाद, महासिद्धा जडीवेडर,बाळू गुरव, अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि आशा वर्कर उपस्थित होते.


भिवर्गी ता.जत येथे कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात आली.