कोरोनावरील लस घेऊन सुरक्षित राहावे ; जतचे पोलीस पाटील मदन मानेपाटील यांचे आवाहन

जत,संकेत टाइम्स : कोरोनावरील लस अत्यंत प्रभावी आहे. सर्व नागरिकांनी लस घेऊन कोरोनापासून आपला बचाव करावा असे आवाहन,जतचे पोलीस‌ पाटील मदन मानेपाटील यांनी केले.
जत‌ येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये रविवारी कोविड लसीचा डोस घेतला.माने पाटील म्हणाले, कोरोनावरील लस अत्यंत प्रभावी आहे. लसीकरणाचे दोन्हीही डोस पूर्ण झाल्यानंतर केवळ 0.02 ते 0.4 टक्के लोकांनाच काहीसा त्रास झाला असल्याचे समजते. पहिला डॉस झाल्यानंतर 45 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. अनेकांना याचा अजिबात त्रास झालेलाच नाही.सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो आहे. यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना पासून आपला बचाव करावा.


जत‌ कोविड लस घेताना मदन माने पाटील