जतेत दारू विक्रेत्यांनी सिमा ओलांडल्या | संख बेकायदा दारू पुरवठ्याचे केंद्र

जत,संकेत टाइम्स : जत पुर्व भागातील गावागावात बेकायदा दारू अड्डे बहरले आहेत.कोरोना काळात एकीकडे सर्व दुकाने बंद झाली असतानाही या बेकायदा दारू विक्रेत्यांकडे दारू उपलब्ध होतेच कोठून हा संशोधनाचा विषय आहे.पुर्व भागातील संख येथील दारू दुकानातून मोठ्या प्रमाणात बॉक्सने दारू अशा अवैध दारू विक्रेत्यांना पोहच केली जात असल्याची चर्चा आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून घरपोच दारू विक्री करण्याचा परवाना दिला असतानही संख येथील दारू दुकानातून कोरोनाचे नियम ढाब्यावर बसवून थेट काऊंटरवरून दारू विक्री सुरू असल्याची प्रकार उघड झाला आहे. त्या पलिकडे जात दुकानातून थेट पुर्व भागातील गावागावात बेकायदा दारू अड्ड्यावर दारू पोहच केली जात असल्याची चर्चा आहे. यापुर्वी अशा अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलीसांनी मारलेल्या छाप्यात या दारू दुकानातून दारू आणल्याचे स्पष्ट आहे.तरीही जतच्या उत्पादन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे कायदा सुव्यवस्था बिघविण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.संख मधील दारू विक्रेत्यांने कायदा पायदळी तुडविल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.त्यापेक्षा पुढे जात गावागावात कोरोना प्रसाराची केंद्रे स्थापन करून पोलीस,उत्पादन शुल्क विभागाच्या‌ यंत्रणेला आवाहन दिले आहे.