बाप लेकास काठीने मारहाण

 


जत : शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून बाज ता.जत येथील रावसो मारोती गडदे आणि त्यांचा मुलगा मारुतीराव गडदे यांना चार जणांनी काठीने लाथाबुक्क्यांनी मारले.2 एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास मारहाणीची घटना घडली.


बाळू रामू गडदे, जगन्नाथ बाळ गडदे, विठू बाळू गडदे, शोभा बाळू गडदे सर्व रा.बाज ता. जत अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. रावसो गडदे यांच्या घरासमोर बाळू आणि त्याच्या कुटुंबातील लोक जमले दोघांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.