तालुक्यातील कोरोना लसीकरण वाढवा ; मंत्री विश्वजीत कदम | जतेत आढावा बैठक

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील लोंकसंख्येनुसार कोरोना लस घेणारी संख्या 20 टक्के आहे.लसीकरणाची गती वाढवावी,कोरोना रोकण्यात लसीकरणाचा फायदा होत आहे,अशा सुचना कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आरोग्य विभागाला केल्या.
मंत्री विश्वजीत कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,तहसीलदार हणमंत म्हेत्रे,व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री विश्वजीत कदम म्हणाले,जत तालुक्यात कोरोना लसीकरण फार अत्यल्प होत आहे.त्यात गती वाढविण्याची गरज आहे.ग्रामपंचायतीना कडून लसीकरणा बाबत जागृत्ती करावी,शासकीय कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी.त्यामुळे कोरोना रोखण्यात मदत होईल.
मंत्री विश्वजीत कदम म्हणाले,जत शहर व तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी सध्या प्रशासनाबरोबर काम करावे,शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे.राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही, मात्र त्यांचा वापर राज्य टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत आहे.
मंत्री विश्वजीत कदम म्हणाले,जत शहरात शासनाच्या नगर विकास खात्याकडून विशेष असा पाच कोटीचा विकास निधी मंजूर झाला आहे. त्यातून कामे सुरू होतील.मुख्याधिकारी गैर हजर बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारू,असेही कदम म्हणाले.
आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले,जत तालुक्यातील अधिकाऱ्या विरोधात तक्रारी आहेत.मात्र आता काळ अडचणीचा आहे.त्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांकडून चांगले काम करून घेण्याची वेळ आली. जत शहरात विकास कामांच्या टेंडर प्रक्रिया सुरू आहेत.पुढील महिन्या भरात कामे सुरू झालेली दिसतील.विकास होत आहे,काही समस्या असतील तर आम्हाला सांगाव्यात,असे आवाहनही आ.सांवत यांनी केली.जत येथील आढावा बैठकीत बोलताना मंत्री विश्वजीत कदम,बाजूस आ.विक्रमसिंह सांवत