रुग्ण वाढीचा‌ वेग‌ कायम ; जत तालुक्यात पुन्हा नवे रुग्ण वाढले | वाचा गुरूवारचे गावनिहान रुग्णसंख्या

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे.गुरूवारी पुन्हा जत शहरासह ग्रामीण भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.गुरूवारी 31 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


नागरिकांची बेपर्वाही कोरोनाचा उद्रेक वाढवत आहे.जत शहर 9,खैराव 1,कुंभारी 1,अमृत्तवाडी 1,वाळेखिंडी 1,शेगाव 1,दरिबडची 1,रामपूर 2,को.बोबलाद 7,करेवाडी को.1 असे एकूण 27 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता अधिकच वाढली आहे.तालुक्यात 237 जण सध्या उपचारा खाली आहेत.तर 77 जणाचा मुत्यू झाला आहे.