आशा वर्कर्सना सेवेत कायम करा,लाल बावटा युनियनची मागणी

डफळापूर, संकेत टाइम्स: कोरोना काळात प्रभावीपणे काम करत असलेल्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करण्यात यावे,यासाठी लोकसभेत आवाज उठवावा,अशी मागणी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने खा.संजयकाका पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे कि, आशा व गटप्रवर्तक या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत पण त्यांच्या कामाला काही मोल नाही.आपण एक कृतिशील खासदार आहात, डॉ.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत रुजू करून घ्यावे,अशी मागणी केली होती.त्यांचप्रमाणे आपण ही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे पाठपुरावा करावा. देशभरात जवळपास 9 लाख आशा व गटप्रवर्तक भगिनी काम करत आहेत. महाराष्ट्र मध्ये 70 हजार आशा वर्कर्स व 3,500 हजार गटप्रवर्तक 
कार्यरत आहेत.पण त्यांचे काम हे  मोबदलावर आहे,तरी आपण स्वतः लक्ष घालून आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांना सेवेत कायमस्वरूपी करावे,यासाठी प्रयत्न करावा व न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कॉ.मिना कोळी, जिल्हा संघटक कॉ.हणमंत कोळी,नजमा शेख उपस्थित होते.


आशा वर्कर्स यांना सेवेत कायम करा,मागणीचे निवेदन खा.संजयकाका पाटील यांना देण्यात आले.