'गुरू ट्रँक्टर्स' च्या माध्यमातून जर्मन टेक्नॉलॉजीचे ट्रँक्टर्स जतेत उपलब्ध

जत,संकेत टाइम्स : 'गुरू ट्रँक्टर्स जत' या फर्मचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते झाले.जत तालुक्यात प्रथमच जगप्रसिध्द जर्मन "लॅम्बोर्गिनी " कंपनीच्या आधुनिक शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परीपुर्ण व जर्मन टेक्नाॅलाॅजीने समृद्ध असे ट्रॅक्टर" सामे डाॅएट्स फार "च्या टु व्हील,फोर‌ व्हील 35 ते 80 एचपीच्या अनेक श्रेणी येथे उपलब्ध आहेत.


जत शहरातील वळसंग रोडवर हे भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे.
अत्याधुनिक मायलेज,व सर्वोत्तम ताकतीच्या टँक्टर्स येथे उपलब्ध करण्यात आले आहे.कंपनीचे सर्व मॉडेल येथे उपलब्ध असून,सर्व्हिस,विक्री पश्चात सेवा या शोरूमच्या माध्यमातून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.गुढी पाडव्याच्या शुभमुहर्तावर या शोरूमचे कोरोनाचे नियम पाळत उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष गोब्बी,डॉ.दत्तात्रय सांवत,
विशाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


‌ येथील गुरू ट्रँक्टर्स शोरूमचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते झाले.