जत शहर चिंताजनक स्थितीत,पुन्हा रुग्ण वाढले | वाचा तालुक्यातील शुक्रवारीची आकडेवारी

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी 24 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यात जत शहरातील 15 रुग्णाचा समावेश आहे.जत शहराची चिंता यामुळे पुन्हा वाढली आहे.
जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत.यामुळे नगरपरिषदेकडून कडक निर्बंध घातले आहेत.शनिवारी,रविवारीही शहर 100 टक्के बंद ठेवण्यात आले असून,नागरिकांना विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.बुधवारी तालुक्यातील वेगवेगळ्या रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या तपासणीत जत शहर 15,शेगाव 1,जाडरबोबलाद 1,बिळूर 1,जालीहाळ 1,दरिबडची 2,गिरगाव 1,माडग्याळ ‌1असे 24 रुग्ण सापडले आहेत. शनिवारी 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यात 256 जण सध्या उपचारा खाली आहेत.तर 77 जणाचा मुत्यू झाला आहे.कोरोना बाधिताची संख्या 2544 वर पोहचली आहे.दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.