जतमध्ये रविवारीही शंभर टक्के प्रतिसाद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यामध्ये विकएंड लॉकडाऊनला रवीवारीही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत.जत शहरासह तालुक्यातील डफळापूर, शेगाव,संख,उमदी,माडग्याळ आदी गावे कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.जत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले स्टँड परिसर,विजापूर-गुहागर महामार्ग,मंगळवार पेठ,बिळूर,छ.शिवाजी,बिळूर चौक,मंगळवार पेठ,मुख्य बाजारपेठ आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली आहे.अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते.दवाखाने,औषध दुकाने मात्र सुरू होती.प्रमुख गावातील मुख्य ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त असून.गजबजणारे शहर आणि परिसरात एकदम शांतता निर्माण झाली. निर्मनुष्य रस्ते, नीरव शांतता यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाली.
पोलीस आणि पालिकेची पथके रस्त्यावर उतरली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट,कापड,ज्वेलर्स,किराणा दुकाने,दुध‌ डेअरी,बेकरी व्यवसाय बंद आहेत. शहरातील सर्व रस्ते रिकामे निर्मनुष्य झाले आहेत. शहरातील वर्दळ शांत होऊन रस्ते ओस पडले आहेत.


जत शहरात सर्वत्र शांतता होती,रस्ते निर्मनुष्य होते.