जत‌ तालुक्यात लाॅकडाऊन काळातही गुटखा विक्री सुरू

जत,संकेत टाइम्स : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लाॅकडाऊनची घाेषणा केली असली, तरी जत,डफळापूर, शेगाव,बिळूर,संख,उमदीत मावा,गुटखा विक्री जाेरात सुरू आहे. ही मावा विक्ररी चाेरून लपून हाेत असल्याने त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शाैकिन चढ्या दराने मावा खरेदी करीत असून, खावा खाणारे कुठेही उघड्यावर थुंकत असल्याने हा प्रकार काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची व त्यातून धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.लाॅकडाऊनमुळे सुपारीच्या व सुगंधित तंबाखूच्या किमतीत वाढ झाल्याने 
मावाच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली. दुसरीकडे, या किमती दुपटीने वाढल्याची माहिती मावा खाणाऱ्यांनी दिली. बहुतांश तरुण मावा खाऊन मनात येईल तिथे थुंकतात. यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे काेराेना पाॅझिटिव्ह व्यक्तींच्या थुंकीद्वारे काेराेनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य किराणा साहित्यासाेबत 
कर्नाटकातून जत शहरात पाठविले जाते. लाॅकडाऊनमुळे त्या साहित्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. वास्तवात,जत, शहरातील बहुतांश दुकाने बंद असतानाही शाैकिनांना सहज मावा,गुटखा उपलब्ध हाेताे. त्यामुळे विक्रीची दुकाने शाेधून विक्रेत्यांवर कारवाई करणे प्रशासनासाठी डाेकेदुखी ठरत आहे.