जत तालुक्यात कोरोनामुळे तिघाचा मुत्यू | शनिवारीही नव्या रुग्णाची शंभरी | डफळापूर,शेगावमध्ये रुग्ण वाढले

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा नव्या कोरोना रुग्णाची संख्या शंभरीवर गेली असून शनिवारी करण्यात आलेल्या तपासणीत तालुक्यातील जत शहरासह 26 गावात तब्बल 103 नवे रुग्ण,तर तीन रुग्णाचा मुत्यू झाल्याने धोका मानगुटीवर कायम आहे. 

लसीकरण,सोशल डिस्टसिंग,मास्क,सँनिटायझर हे एकमेव पर्याय उरले आहेत.शनिवारीही जत शहरात विस्फोट झाला असून 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत.त्याचबरोबर उमदी,शेगाव,येळवी,डफळापूर, येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आले आहेत.



रुग्ण वाढीच्या वेगात शेगाव,डफळापूर आघाडीवर आहे.दोन्ही गावात शनिवारी नवे 8 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या साडेतीन हजारावर गेली आहे.



सध्या तालुक्यातील 824 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 682 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.शनिवारी तालुक्यात आढळलेले नवे रुग्ण जत शहर 25,वाळेखिंडी 4,बाज 1,बिळूर 2,अचकनहळ्ळी 1,संख 1,उमदी 5,धावडवाडी 1वळसंग 3,शेगाव 8,माडग्याळ 4,जा.बोबलाद 1,खैराव 1,



येळवी 6,रा.वाडी 1,डफळापूर 8,कुंभारी 3,बनाळी 1,उंटवाडी 2,येळदरी 1,सांगोला 2,मंगळवेढा 3,पंढरपूर 2,विजापूर 3 असे एकूण 103 रुग्ण आढळून आले आहेत. उपचारा दरम्यान 3 रुग्णाचा दुर्दैवाने मुत्यू झाला.शनिवारी 21 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.