डफळापूरमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी

डफळापूर, संकेत टाइम्स : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती निमित्त लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून जंयतीचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन साहय्यक महावितरणचे अभियंता रुपेश कोरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,चव्हाण कंस्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन बाळासाहेब चव्हाण, संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,कॉ.हणमंत कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे,आरडी कंस्ट्रक्शनचे संचालक रवि किरण भोसले,दिपक भोसले,प्रवीण गुरव उपस्थित होते.


डफळापूर ता.जत येथे महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.