जतच्या मेहेजबीन मुजावर हिचे सेट परीक्षेत यश

जत,संकेत टाइम्स : जत(ता.जत) येथील कु.मेहेजबीन रफिक मुजावर हिने जून 2020 मध्ये झालेल्या सेट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे.सेट परीक्षेचा नुकताच निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे.त्यात मुजावर ह्या उत्तीर्ण झाल्या आहेत.
जत येथे राहणाऱ्या कु.मुजावर यांनी
पदवीचे शिक्षण हे राजे रामराव महाविद्यालय,जत येथे पूर्ण केले आहे.तर पदव्युत्तरचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे केले आहे.2017 मध्ये बीएसस्सी व एमएसस्सी विशेष श्रेणीने उत्तीर्ण झाल्या आहेत.कु.मुजावर ह्या राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून
डॉ.शिवाजी कुलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पि.एचडीचे संशोधन करत आहेत.कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ,डॉ.ए.एम.सरगर,डॉ संजय लठ्ठे,प्रा.के.के रानगर,प्रा.दिपक कुंभार व प्रा.गोविद साळूखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जत सारख्या ग्रामीण भागातून कु.मुजावर यांनी रसायनशास्त्र विषयात आवड व साधना करून हे यश संपादन करत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या परिश्रमाचे चीज करून रसायनशास्त्र विषयाची आवड जोपासली आणि आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून यश निश्चित करत ते मिळविले आहे.