डफळापूर पेयजल पाणी योजनेतून तात्काळ पाणी सोडा ; मंत्री विश्वजीत कदम यांचे आदेश | योजनेच्या कामाची केली पाहणी

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील पेयजल पाणी 
योजनेच्या कामाची पाहणी कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली.यावेळी मंत्री कदम यांनी योजनेच्या शुध्दीकरण यंत्रणा,टाक्या,वितरण प्रणालीची पाहणी केली.


सध्या योजनेचे काम अंतिम टप्यात आहे.विहिर मोटारी,पाईपलाईन,टाक्या,
शुध्दीकरण यंत्रणा,गावातील विज जोडण्यात पुर्ण करण्यात येत आहेत.सध्या डफळापूर नजिकच्या एकविरा मंदिराजवळील शुध्दीकरण प्रकल्पाजवळ विद्युत जोडणीची गरज आहे. मात्र महावितरण कडून विज जोडणीबाबत हालगर्जीपणा करण्यात‌ येत असल्याची माहिती‌ मंत्री कदम यांना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी दिली.मंत्री कदम यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी सानप तातडीने शुध्दीकरण प्रकल्पाजवळ विद्युत टान्सफार्म,विजजोडणी करण्याचे आदेश दिले.त्याशिवाय यापुर्वी आपण केलेल्या 
सहकार्यमुळे योजनेच्या कामाला गती आल्याचेही सांगितले. येत्या काही महिन्यात योजनेचे उद्घाटन करण्यात येणार असून आपण उपस्थित रहावे,असे निमंत्रणही चव्हाण यांनी मंत्री कदम यांना दिले.
दरम्यान,या योजनेबाबत अडचणी दुर करून नागरिकांना लवकरा लवकर पाणी देण्यासाठी कारवाई करण्याच्या सुचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री कदम यांनी दिले.


 
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत, जिल्हा परिषद महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, अभियंता माळी,तांत्रिक सल्लागार के.डी.मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

डफळापूर पेयजल योजनेची मंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली.