डफळापूरचा आठवडा बाजार तहसीलदारांनी हटविला

जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद असतानाही डफळापूर ता.जत येथे भरलेला आठवडा बाजार तहसीलदार सचिन पाटील यांनी हटविला.
डफळापूर येथे गुरूवार आठवडा बाजार असतो.कोरोनाचे निर्बंध,बाजार न भरविण्याचे आदेश आहेत.तरीही काही व्यापाऱ्यांनी बाजार भरविला होता.त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.मास्क, सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. 



दरम्यान सकाळपासून या कामगिरीवर नेमलेले पोलीसांना ही गर्दी रोकता आली नाही.तहसीलदार सचिन पाटील हे मिरवाड़ येथून जतकडे परतत असताना त्यांनी गर्दी पाहून थेट बाजार,मुख्य पेठलाईनमध्ये उतरत बाजार हटविण्याचे आवाहन केले.त्यानंतर बाजारातील व्यापारी,दुकानदारांनी दुकाने बंद केली.दरम्यान शासनाचे निर्बंध नागरिकांच्या हितासाठी आहेत.



त्यांचे काटेकोर पालन करावे,ग्रामपंचायती कडून हालगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.शासन आदेशानुसार ग्रामपंचायती कडून कारवाई करण्यात यावी,अशा सुचना दिल्या.दरम्यान पोलीसांची कोरोना निर्बंधात बेफिकीर पणा पुन्हा स्पष्ट झाला आहे.डफळापूर येथे पोलीस असतानाही बाजार भरला होता.मोठ्या संख्येने नागरिकांना पोलीसांनी अटकाव केला नाही,याबाबत आर्श्चर्य व्यक्त होत आहे.