कुडणरमधील स्वस्तधान्य दुकानदारांकडून कार्डधारकांची लुट

जत,संकेत टाइम्स : कुडणूर ता.जत येथील स्वस्तधान्य दुकानदाराकडून कार्डधारकांची लुट सुरू असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा तालुक्यातील काही रेशन धान्य दुकानदार लुटेरे बनले आहेत.  कुडणूर येथील रेशन दुकानदाराकडून कार्डवर नाव असतानाही धान्य दिले जात नसल्याची तक्रार कार्डधारक पुतळाबाई वामन पांढरे यांनी तहसीलदार यांच्याकडे दिली आहे. अनेक दिवसापासून हे स्वस्तधान्य दुकानदारातून राजरोसपणे लुट सुरू असल्याचे आरोप होत आहेत.दुकान एका महिलेच्या नावावर आहे.तिसराच व्यक्ती दुकान चालवित आहे.अनेक रेशनकार्ड धारक,अन्नसुरक्षा यादीतील धान्याचे वाटप व्यवस्थित केले जात नसल्याचे आरोप आहेत.या दुकानाची चौकशी करावी अशी मागणी पुतळाबाई पांढरे यांनी केली आहे.