दुसऱ्यादिवशी अवकाळीचा फटका | तालुकाभर गारा,वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

जत,संकेत‌ टाइम्स : जत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.दिवसभराच्या उकाड्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला.बेंळूखी ता.जत येथे जय भवानी हायस्कूलची इमारत पुर्णत: जमिनदोस्त झाली.त्याशिवाय अनेक घराचे पत्रे उडाले आहेत.केळी,द्राक्षवेलीची पाने गाराच्या तडाख्याने तुटली आहेत.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कानठळया बसविणाऱ्या मेघगर्जनेमुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. 
काही भागात झाडे मुळासह उखडून पडली तर झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. सुमारे चार तासाच्या पावसामुळे रस्ते जलमय झाले.बेंळूखी परिसरातील बंधारे तुंडूब भरले आहेत.पावसाला सुरुवात झाल्यानंतर हेरले परिसरातील विविध भागातील वीज पुरवठा काही वेळ खंडित झाला.यामुळे नागरिकांत आणखीच घबराट पसरली.तालुक्याच्या विविध भागातही जोरदार पाऊस झाला.गारा,विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक घरे,आंबा,डाळींब,भाजी पाल्याचे मोठे नुकसान केले. सर्वच गावात कमी अधिक स्वरूपात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान सुरूच आहे. जोरदार गारांचा पाऊस झाल्याचे सर्वत्र गारांचा खच पडला आहे.
तालुक्याच्या बहुतांशी गावात सोमवारी (ता.26) सायकांळी पाच वाजले
पासून वातावरणात बदल होत गेला. वादळी वारा विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरवात झाली. तसंच ढग जमा होऊन गारांचा जोरदार पाऊस झाला. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचे खच साचले होते.


जत तालुक्यातील जत,डफळापूर, बाज परिसरातही गारांसह जोरदार पाऊस झाला.जत तालुक्यात गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे ऊस पिक आडवे झाले आहे.डांळिब,भाजी पाल्याला फटका बसला आहे.
अनेक‌ गावात रब्बी ज्वारीचा कडबा भिजल्याने चारा टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी चार वाजलेपासून आकाशात ढग जमा झाले,अचानक रविवारीही अशाच‌ पध्दतीने ढग जमा होऊन विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरूवात झाली.त्यातच गाराचाही मारा झाला.सलग दोन दिवसाच्या या वादळी पावसाने सर्वाधिक अंबा पिकाला फटका बसल्याचा अंदाज आहे.काढणी योग्य असणारा अंबा बागेचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय डांळिब,भाजी पाल्यालाही फटका बसला आहे.तालुक्यात कोरोनाचा एकीकडे जीवघेणा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे आक्राळ विक्राळ विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपले आहे.अनेक गावात बांधे भरतील असा पाऊस झाला आहे.बेंळूखी ता.जत येथे न्यू इंग्लिश स्कूलची इमारात वादळी वाऱ्याने जमिनदोस्त झाली आहे.तर डफळापूर परिसरातील द्राक्ष बागाची पाने तुटली आहेत.