जतेत सोमवारी दुपारनंतर निम्म्यापेक्षा अधिक दुकानांचे शटर डाऊन

जत,संकेत टाइम्स : शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानांतर्गत शनिवार,रविवार कडकडीत‌ बंद नंतर  साहव्या दिवशीही वाहतूक आणि इतर व्यवहार तर सुरळीत राहिले. मात्र बाजारपेठेतील निम्म्यापेक्षा अधिक दुकानांचे शटर डाऊन झाल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.लॉकडाऊन होण्याच्या भितीने काही किराणा दुकाने,भाजी बाजारात गर्दी दिसून आली.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने काही व्यवसायांवर निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांची मंगळवारी पहिल्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही. आदेशातील संभ्रमामुळे अनेक व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे बाजारपेठेत दुकाने सुरू ठेवली होती. मात्र शनिवार,रविवार कडक लॉकडाऊन नंतर सोमवारी प्रशासनाकडून केलेल्या आवाहनामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील निम्म्यापेक्षा अधिक दुकाने बंद करण्यात आली.