मोरबगी कडकडीत बंद

करजगी,संकेत टाइम्स :
मोरबगी ता.जत येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक दक्षता कमिटी बैठक घेऊन गाव बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.गावातील दुकाने बंद असल्याने चौक,रस्ते सुनसान झाले आहेत.
शनीवारचा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे. गावातील व्यापाऱ्यासह नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. व्यापारी,दुकानदारांनी घरीच राहणे पंत केल्याने गाव 100 टक्के लॉकडाऊन झाले आहे.नागरिकांनी मास्क,सोशल डिस्टसिंग पाळत‌ काळजी घेण्याचे आवाहन,ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोरबगी ता.जत येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.