किरकोळ कारणावरून दगडाने मारहाण,तोडफोड करून नुकसान

 


जत : किरकोळ कारणावरून सख्ख्या भावावर एकाने हल्ला केला.दगडाने मारहाण करण्यात आली. पहारीने मारले शिवाय समाईक बोरवेल्सची पेटी फोडली. मोटर सायकलवर दगडी मारून तिचेही नुकसान केले. आप्पासाहेब सुभाष पाटील रा.जिरग्याळ ता.जत याच्यावर सख्खा भाऊ बाळासाहेब सुभाष पाटील याने दोन एप्रिल रोजी सायंकाळी आठ च्या सुमारास हल्ला केला. दगड आणि पहारीने मारून जखमी केले समाईक विहिरीवरील मोटार सुरू केल्याचा रागातून हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.