वैरणीची बलीम अज्ञाताने पेटविली

जत,संकेत टाइम्स : निगडी खु.ता.जत येथील मारूती बिरा माने व त्यांच्या भावाची बलीम रवीवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटविला.यात 78 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे, याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, मारूती माने व त्यांच्या भावाच्या शेतातील ज्वारीची काढणी,मळणी झाली आहे. ज्वारीचा 5200 पेंडी कडबा त्यांनी घराजवळ गोळा करून बलिम रचून ठेवला होता.शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातानी पेटवून दिले त्यात सर्व पेंढ्या जळून खाक झाल्या आहेत.