जत पश्चिम भाग पुर्णत:सिंचनाखाली | कुडणूर,सनमडी बंधिस्त वितरिका कार्यान्वित

जत,संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील म्हैसाळ पाण्यापासून वंचित असणाऱ्या भाग बिळूर,देवनाळ कालव्याच्या बंधिस्त पाईपलाईनद्वारे ओलिताखाली येणार आहे.लवकरचं सर्व बंधिस्त पाईपलाईन कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती खा.संजयकाका पाटील यांनी दिली.
बिळूर कालवा क्र.2 किलोमीटर 13 मधून डफळापूर लघु वितरिका क्रंमाक 1 मधून बंदिस्त नलिकेद्वारे पाणी सोडण्यात आले.यांचे उद्घाटन खा.पाटील,आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.जत पश्चिम भागातील,डफळापूर, कुडणूर,शिंगणापूर,शेळकेवाडी,जिरग्याळ,मिरवाड,खलाटीच्या काही भागात म्हैसाळ योजनेतून पाणी पोहचत नव्हते.त्यामुळे खा.पाटील यांच्या माध्यमातून या भागाला पाणी देता यावे यासाठी बंधिस्त पाईपलाईनची योजना आखण्यात आली होती.ती आता पुर्णत्वाकडे आली आहे. त्या माध्यमातून मुख्य कँनॉलमधून उर्वरित भागांना आता ओलिताखाली आणणे शक्य‌ झाले आहे. शुक्रवारी या बंधिस्त पाईपलाईनच्या कुडणूर,सनमडी परिसरात पाणी पोहचण्याच्या वितरिका कार्यान्वित करण्यात आली.यामुळे डफळापूर, कुडणूर हद्दीतील 350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
दरम्यान म्हैसाळ योजनेच्या जत कालवा किलोमीटर 74 द्वारे कुणीकोणूर वितरिका बंदिस्त पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या सनमडी,कुणीकोणूर,खैराव,टोणेवाडी या गावातील 820 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.दरम्यान अन्य बंधिस्त पाईपलाईन कामाची माहिती यावेळी खा.पाटील व आ.सांवत यांनी घेतली.तातडीने कामे पुर्ण करून पाणी सोडावे, असे आदेशही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. तालुक्यातील सिंचनापासून वचिंत गावांना पाणी देण्यासाठी आम्ही वचनबंध्द आहोत,असे यावेळी खा.पाटील व आ.विक्रमसिंह सांवत यांनी दिली.
यावेळी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, माजी सभापती बाबासाहेब कोडग,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,संजय शिंदे,म्हैसाळ योजनेचे अभिंयता अभिमन्यू मासाळ,ए.एफ.मिरजकर, मनोज कर्नाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


म्हैसाळ सिंचन योजनेच्या बंधिस्त पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले.