डफळापूर सबस्टेशनचा अभियंता गायब ? | नियंत्रण नसल्याने विजेचा लपंडाव सुरू ; वरिष्ठाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील

डफळापूर सब स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.तर सब स्टेशनचा अभियंताच

अनेक दिवस गायब असल्याने तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न नागरिकासमोर उभा आहे.

दुसरीकडे स्थानिक नेते व वरिष्ठ अधिकाऱ्याचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष नागरिकांना ऐन उन्हाळ्यात घामाघुम करत आहे.







डफळापूर सब स्टेशनचा यापुर्वी विज पुरवठा सुरळीत होता.मात्र गेल्या काही दिवसापुर्वी या सब स्टेशनला एक नवा अभियंता हजर झाला आहे. त्यांची नेमणूक झाल्यामुळे विजेचा लंपडाव सुरू आहे.अभियंता अनेक दिवस गैरहजर राहत असल्याने कर्मचाऱ्यावरचे नियंत्रण सुटले असून सातत्याने खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याच्या तक्रारी करूनही कारभार सुधारत नसल्याने विज ग्राहक संतप्त झाले आहेत.

गेल्या पंधरा दिवसापासून विजेचा सातत्याने लंपडाव सुरू आहे. 






कोणत्याही क्षणी वीज जाते,ती तब्बल तासतास् भर खंडित असते,असे दिवसातून दहा ते बारा वेळा होत आहे.अनेक वेळा उच्च दाबाचा 

विद्युत पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेली तर, रात्र जागूनच काढावी लागत आहे, ही परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. 






पावसाळ्या पूर्वीची तयारी म्हणून वीज मंडळाने खराब झालेले डीपी, तारा यांची दुरुस्ती करण्यासही अद्याप सुरूवात केलेली नाही.अनेक ठिकाणचेे 

विद्युत खांब वाकले आहेत,विद्युत वाहिन्या जमिनीला टेकतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर 

कालबाह्य झाले आहेत तेथे नव्याने 

Rate Card

टान्सफार्म बसविण्याची गरज आहे. विजेच्या तारांवर लोंबकळणारी झाडे, त्यांच्या फांद्या याचीही तोड रखडली आहे.अनेक गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक असून, येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.






 परंतु महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विद्युत वाहिन्यांना दगडाने दोरी लटकवून ठेवल्या आहेत. त्या कधीही तुटण्याची शक्यता असल्याने महावितरणचे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे यावरून दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने सोसाट्याच्या वाऱ्यात या विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला असलेली डीपीही नेहमी उघडी असते. येथून अनेक लहान मुले, नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या लवकर बदलण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.





अभियंत्याचा खाजगी व्यवसाय 


डफळापूर सबस्टेशनला असणाऱ्या अभियंत्याचा खाजगी व्यवसाय आहे.त्यामुळे ते अनेक दिवस स्टेशनला गैरहजर राहतात,अनेक वेळा हजेरी लावून परतत,असल्याने स्टेशनचा कारभार विस्कळित झाल्याचा शेतकरी,नागरिकांचा आरोप आहे.दरम्यान तालुक्यातील वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.मात्र त्यालाही ते दाद देत नाहीत.परिणामी कार्यालयाचा प्रमुखच उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी गंभीर नसल्याचे वास्तव आहे.





आम्ही नोटिसा बजावल्या आहेत.


डफळापूर सबस्टेशनचा अभियंते गैरहजर राहत,असल्याबद्दल आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत.त्यांना उपस्थिती दर्शवावी,व कारभारात सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.तरीही त्यांच्याकडून सुधारणा झाल्या नाही.आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रारी करण्याची गरज आहे.


सचिन माळी,तालुका अभियंते,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.