शॉर्टसर्किटमुळे केळी बागेला आग,एक ‌लाखाचे‌ नुकसान

जत,संकेत टाइम्स : बाज‌‌ ता.जत‌,येथील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे केळी बागेला आग लागली.यात बागेचे एक लाख‌ रूपयाचे‌ नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी, विज‌ वाहिन्याची सातत्याने दुरूस्ती केली जात‌ नाही.परिणामी वाहिन्या टान्सफार्म मधून सातत्याने शॉर्टसर्किटच्या घटना वाढत आहेत.सोमवारी अशीच घटना बाजमध्ये‌ घडली.बाज येथील विनायक दत्तात्रय गडदे यांच्या गट नं.725 मधील दोन एकर केळी बागेतून गेलेल्या वायरिंगला शार्ट सर्किट झाल्याने केळीला आग‌ लागली.त्यात सुमारे 1लाख‌ रुपयाचे‌ नुकसान झाले आहे.विज वितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाज ता.जत येथे जळालेली केळीची बाग