उमदीत रक्तदान शिबीर संपन्न

बालगाव,वार्ताहर : उमदी(ता.जत) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोणाच्या महाभंयकर रोगाने अवग्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुन्हा एकदा डोके वर काढुन थैमान घातले आहे.अनेक रुग्ण ऑक्सिजन, रक्त मिळत नसल्याने मृत्युमुखी पडत आहेत. लाखोंने पैसे जवळ असताना देखील जगणं मुश्कील झाले आहे. त्यामुळे अशा भंयकर परिस्थितीत माणुसकीचे नाते जपत माणसांनी माणसाच्या मदतीला येण्यासाठी किमान रक्तदान तरी करावे या उद्देशाने उमदी येथे सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय,उमदी येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजले पासून संध्याकाळ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी उमदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात रक्तदान करून माणुसकी जपावी अशी विनंती केली होती या कार्यक्रमाला अनेक लोकांनी उपस्थित दाखवत मोठा प्रतिसाद दिला.यावेळी अमोल डफळे, ऍड चनांप्पा आण्णा होर्तिकर,फिरोज भाई मुल्ला,मानसिद्द पुजारी,निसारभाई मुल्ला,रामू कोळगेरी, राजू पाटील,कलप्पा हलकुडे, बाबू नागोंड, अरविंद खवेकर, राजू मकांदार आदी मान्यवर उपस्थित होते.


उमदी ता.जत येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.