उमदी,डफळापूरमध्ये कोविड रुग्णालय |आमदार विक्रमसिंह सांवत मैदानात | माडग्याळ रुग्णालयाचीही पाहणी

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विक्रम फाऊंडेशन नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा मैदानात उतरले आहे.या फाऊंडेशच्या माध्यमातून डफळापूर, उमदी येथे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिली.दरम्यान माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे 40 बेडच्या रुग्णालय उभारणी कामाची पाहणी सांवत यांनी केली.





सध्या जत तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.पुढेही स्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात डफळापूर, पुर्व भागात उमदी येथे असे दोन ठिकाणी ऑक्सीजनच्या 40 बेडची सोय असलेले कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे.आमदार सावंत यांनी उमदी येथे कोविड रुग्णालयासाठी जागेची पाहणी केली. तसेच उमदी येथील स्थानिक डॉक्टरांची बैठक घेतली.







यावेळी आमदार सावंत,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,रोहन चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,डॉ.हत्तळ्ळी,डॉ.मदगोंड, डॉ.लोणी,डॉ.हिरेमठ आदी उपस्थित होते.







आमदार सावंत म्हणाले की,गेल्या काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रसार रोकण्यासाठी रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत,यासाठी आम्ही सोयी उपलब्ध करत आहोत,प्रांरभी माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात 40 बेडचे रुग्णालय एकदोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे.


Rate Card






त्याशिवाय विक्रम फाऊंडेशनच्या वतीने उमदी येथे 40 ऑक्सीजन युक्त बेडचे रुग्णालय तातडीने सुरू करण्यात येणार आहे.सर्व औषधोपचार,डॉक्टरांना आवश्यक असणारे पीपीई किट,मास शिल्ड आदी साहित्य सर्व उपयोजना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.तसेच रुग्णांना चहा व नाष्टा या सोयी उपलब्ध होतील.माणुसकीच्या दृष्टीकोनातून उमदी येथील सर्व डॉक्टरांनी संभाव्य रुग्णावर उपचार करावेत अशा,आमदार सावंत यांच्या आवाहनाला उमदीतील डॉक्टरांनी प्रतिसाद देत,उपचार करण्याची ग्वाही दिली.त्याचप्रमाणे डफळापूर येथे श्री दत्त पतसंस्थेच्या वतीने 40 बेडचे कोविड रुग्णालय उभे करण्यात येणार आहे.








विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम म्हणाले की, विक्रम फाऊंडेशन कडून कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे.सध्या कोरोना रुग्णांना तात्काळ उपचाराची गरज आहे. त्या रुग्णांना उपचाराची सोय व्हावी,यासाठी आम्ही सज्ज झालो आहेत.आमदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उमदी येथे कोविड रुग्णालय करण्यात येणार आहे. येथे स्थानिक डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करणार आहेत.या मोहिमेसाठी सहकारी पतसंस्था,सेवाभावी संस्थानी मदत करावी,असे‌ आवाहनही निकम यांनी केले.





उमदी ता.जत येथे कोविड रुग्णालय उभारण्यात बाबत डॉक्टरांसोबत‌ चर्चा करताना आमदार विक्रमसिंह सांवत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.